आषाढी वारी प्रतिकात्मक पध्दतीने साजरी करावी

भारत नागणे
गुरुवार, 10 जून 2021

कोरोना संसर्ग अजूनही पूर्णपणे आटोक्यात आला नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा प्रस्ताव पाठवला आहे.

पंढरपूर  -  राज्यात कोरोनाचा Corona धोका अजून ही कायम असल्याने यंदाचा आषाढी Ashadhi पायी वारीचा Wari सोहळा प्रतिकात्मक पध्दतीने साजरा करावा असा प्रस्ताव सोलापूरचे Solapur जिल्हाधिकारी Collector मिलिंद शंभरकर यांनी  राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिला आहे. Ashadhi Wari should be celebrated symbolically

पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी

यावर आज  निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या 1 जुलै रोजी संत तुकाराम Tukaram  महाराज व 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar महाराज पालखी Palakhi सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाच्या आषाढी वारी पायी सोहळ्यास परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायातील विविध महाराजांनी व वारकऱ्यांनी यापूर्वीच केली आहे.

पहा व्हिडीओ -

अशातच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक पध्दतीने आषाढी वारी साजरी करावा असा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन विभाग यावर काय निर्णय घेणार आहे याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe
 


संबंधित बातम्या

Saam TV Live