आशिष शेलार याचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

कोरोनाचे अनलाॅकचे टप्पे पाच आहेत की 15 टप्पे आहेत हे जनतेला कळत नाही.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भुमिका म्हणजे तोंडात गोड अन मनात खोड अशी असल्याची घणाघाती टिका भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.  तसचं मराठा आरक्षणाचा खुन झाला आणि अहित झालं यामध्ये चव्हाणांची भुमिका दुतोंडी असल्याची टिका ही शेलार यांनी केली आहे. शेलार आज नांदेड मध्ये बोलत होते. (Ashish Shelar criticizes Thackeray government)

ओबीसींच्या निवडणूकीतील आरक्षणाला नख लावण्याचं काम उध्दव ठाकरे सरकारने केलं असल्याची जोरदार टिका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलीय आहे.  ठाकरे  सरकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टीकलं नाही. त्यामुळे आता तरी सुधरा असं अवाहन भाजपकडून करत असल्याचं शेलार म्हणाले.

हे देखील पाहा

कोरोनाचे अनलाॅकचे टप्पे पाच आहेत की 15 टप्पे आहेत हे जनतेला कळत नाही. सरकारमधील सचिवांना माझे अवाहन आहे की, या पाच टप्यांची माहिती जनतेला सविस्तर द्यावी अस मत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज नांदेडमध्ये केलं आहे. सरकारला लाॅकडाऊन लावूनही कोरोनाला निर्बंध घालण्यात यश आले नाही. हे अपयश खोट्या सर्व्ह च्या आधारे झाकण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याची टिका शेलार यांनी केलीय.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live