पोलिसांना खुल्या दारु विक्रीचा व्हिडिओ पाठवला अन, पडलं महागात...!

विश्वभूषण लिमये
मंगळवार, 8 जून 2021

पोलिसांना गावात सार्वजनिक रस्त्यावर बसून दारु विक्री करत असलेल्या इसमाचा व्हिडीओ पाठवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मी करत असलेल्या दारु विक्रीचा व्हिडीओ का पाठवला म्हणून त्या गावगुंडाने त्या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. 

सोलापूर:  पोलिसांना गावात सार्वजनिक रस्त्यावर बसून दारु विक्री करत असलेल्या इसमाचा व्हिडीओ पाठवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मी करत असलेल्या दारु विक्रीचा व्हिडीओ का पाठवला म्हणून त्या गावगुंडाने त्या तरुणावर प्राणघातक हल्ला Attack केला आहे. सोलापूर Solapur जिल्ह्यातल्या मोहोळ Mohol पोलीस Police ठाण्याच्या हद्दीतल्या सय्यद वरवडे गावात सदरची घटना घडली आहे. Assault on youth for sending video of open liquor sales to police

पुढील उपचारासाठी या घटनेतील जखमी युवकाला सोलापूरला हलवण्यात आले आहे. गावातील कुमार पारवे नावाचा गावगुंड पुणे-विजापूर बायपास महामार्गावर सय्यद वरवडे येथे कडक लॉकडाऊन Lockdown असतानाही सार्वजनिक रस्त्यावर बसून त्याचे दारू विक्री Liquor sales करणे सुरु होते. त्याचा परिसरातील स्थानिकांना त्रास होत होता.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळमध्ये काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ आंदोलन

गावातल्या महिला-मुलींच्या समोरच तळीराम अर्वाच्च शिवीगाळ करत होते. याबाबत दारु विक्रेत्याला वारंवार कल्पना दिली असता, तो या गावात आपल्याला कोणीच रोखणार नसल्याचा दावा करुन कोणालाच जुमानत नव्हता.कुमारचा भाऊ उमेश हा दिवसाढवळ्या दारु विकत असल्याचा व्हिडीओ गावातील समीर मुजावर या तरुणाने मोहोळ पोलिस स्टेशनला पाठवला. त्यामुळं या अवैध दारु अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.

हे देखील पहा -

त्याचा राग मनात धरून समीर मुजावर या तरुणावर काल रात्री ८.३० वाजता प्राणघातक हल्ला केला आहे. जखमी तरुण समीर मुजावर याने हा हल्ला कुमार पारवे आणि अक्षय पारवे या दोघांनी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. समीरवर सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये Civil Hospital उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस चौकीत गुन्ह्याची Crime नोंद झाली आहे. सदरचा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे Police वर्ग करण्यात येणार आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live