यवतमाळ येथे जिम उघडल्याने फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण.. 

प्रसाद नायगावकर
सोमवार, 7 जून 2021

यवतमाळ जिल्ह्यातील आजपासून जिम उघडली आहेत. फिटनेस प्रेमींमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. कोरोना कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून जिम सेंटर्स हे बंद होते. जिम उघडावे यासाठी राज्य शासनाकडे फिटनेस प्रेमींनी अनेक वेळा मागणी केली होती. 

यवतमाळ :  राज्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात कोविडच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.  त्यानुसार आता  यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील आजपासून व्यायामशाळा GYM उघडण्यात येणार आहेत.  त्यामुळे फिटनेस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोना Corona च्या प्रादुर्भावमुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिम सेंटर्स हे बंद होते. जिम उघडण्यासाठी राज्य शासनाकडे Government फिटनेस प्रेमींनी अनेक वेळा मागणी केली होती. त्यानंतर आता शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत, जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (An atmosphere of happiness among fitness lovers after opening a gym at Yavatmal)  

जिममध्ये सॅनिटायझर Sanitizer, सोशल Social डिस्टनसिंगचे नियम पाळले जाणार आहे. फिटनेसप्रेमी जिम उघडण्यात येणार म्हणून खुश आहेत. आज सकाळ पासून फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने सगळ्या अटी व नियमाचे पालन करून जिम करत आहेत. अनेक दिवस जिम असोसिएशन जिम उघडा म्हणून आंदोलन करत होते.

देवो के देव...फेम मोहित रैनाची चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

आता जिम सुरू करताना सर्व शासनाचे नियम Rules पाळून जिम सुरू केले जातील अस सांगण्यात आलं आहे. कोरोना टाळण्यासाठी शरीरातील प्रतिकार क्षमता आवश्यक असते. ही प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिम मध्ये वर्क आऊट करणे, अत्यंत महत्वाचे असल्याचे फिटनेस प्रेमींचे म्हणणे होते. यवतमाळ जिल्ह्यात आता लॉकडाउनचे नियम थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. An atmosphere of happiness among fitness lovers after opening a gym at Yavatmal

हे देखील पहा 

राज्य शासनाने दिलेल्या एस ओ पी ला अधीन राहून यवतमाळमध्ये जिम पुन्हा उघडले आहे. यामुळे जिम मध्ये वर्क आऊट करून, घाम गाळणाऱ्या फिटनेस प्रेमींमध्ये सध्या आंनदाचे Happy वातावरण आहे. जिम मध्ये आलेल्या व्यायामप्रेमींचे यावेळी, गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले आहे.  

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live