शासकीय महिला वसतीगृहात महिलांवर अत्याचार

साम टीव्ही
गुरुवार, 4 मार्च 2021

जळगावातील शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय या कृत्यात काही पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचं पीडिताचं म्हणणं आहे. 

जळगावातील शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय या कृत्यात काही पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचं पीडिताचं म्हणणं आहे. या प्रकरणाचे थेट विधिमंडळात पडसाद उमटलेत. 

जळगावातल्या गणेश कॉलनीतील हे आशादीप वसतिगृह पाहा या वसतिगृहात निराधार, अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींना ठेवलं जातं. बाहेरच्या जगानं अत्याचार केलेल्या महिलांना शासकीय वसतिगृहातही नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या वसतिगृहात काही महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा आरोप तिथंल्या काही महिलांनी केलाय. झालेल्या प्रकाराचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी या प्रकरणी चार सदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिलेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकरांच्या महाराष्ट्रात महिलांवर शासकीय वसतिगृहात अत्याचार होत असतील तर ही गंभीर बाब आहे.
सरकारनं या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live