या हल्ल्याचा बदला जरूर घेतला जाईल : CRPF

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, यावर केंद्रीय राखीव दलाने पहिल्यांदा ट्विटरवर प्रतिक्रीय नोंदवताना आम्ही विसरणार नाही आणि आम्ही माफही करणार नाही असा इशारा दिला आहे.

तसेच, पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि आमच्या हुतात्मा बंधूंच्या कुटुंबीयांबरोबर आम्ही असल्याचे केंद्रीय राखीव पोलिस दलाने ट्विटद्वारे सांगितले. या हल्ल्याचा बदला जरूर घेतला जाईल असेही सीआरपीएफच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. दहशतवाद्यांना थेट आणि स्पष्ट इशारा देणारं सीआरपीएफचं हे ट्विट महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. 

Web Title: We will not forget, we will not forgive says CRPF

संबंधित बातम्या

Saam TV Live