हा तर पुरोगामी विचारवंतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ' 

सरकारनामा 
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020


एल्गारचा तपास "एनआयए'कडे देण्याची वेळ पाहिली तर सगळा तपास संशयास्पद वाटतो : थोरात 

 

मुंबई : "एल्गार'चा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

 तपास एनआयएकडे देण्यावरून सत्ताधारी आघाडी सरकारमध्ये काहीसे मतभेद असले तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

थोरात म्हणाले, की तपास एनआयएकडे देऊन पुरोगामी, दलित-आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव आहे. पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई चुकीची आहे. कोणा विरोधात पुरावे असतील तर त्याच समर्थन करणार नाही. 

दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला. आता पुरोगामी विचारवतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असेही ते म्हणाले.  

 

WebTittle ::  This is an attempt to suppress the voice of progressive thinkers'

 

संबंधित बातम्या

Saam TV Live