सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसखेरीचा प्रयत्न, वडील जखमी ( पहा व्हिडिओ )

गोपाल मोटघरे
मंगळवार, 25 मे 2021

नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवड मधिल वरलक्ष्मी संदनिकेत आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास एका चोराने बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी आणि चोरात जोरदार झटापट देखिल झाली

पुणे - नटरंग फेम अभिनेत्री Actressसोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni हिच्या पिंपरी चिंचवड मधिल वरलक्ष्मी संदनिकेत आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास एका चोराने बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी Manohar Kulkarni आणि चोरात जोरदार झटापट देखिल झाली. Attempted robbery at Sonali Kulkarni's house

झटापटीत मनोहर कुलकर्णी हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अजय शेटे अस सोनाली कुलकर्णींच्या घरात बळजबरी शिरणाऱ्या चोराचे नाव आहे. अजय शेटे याला वरलक्ष्मी सोसायटी मधिल नागरीक चोप देत असताना मी सोनालीचा चाहता आहे. अस त्याने बनाव केल्याचा प्रयत्न केला. 

मात्र त्याच्या जवळ आढळून आलेल्या वस्तू वरून तो सोनालीच्या घरात चोरी करण्याच्याच उद्देशाने आला होता अस सोसायटीतील रहिवाशांना आढळून आले. सुदैवाने सोसायटी मध्ये राहणाऱ्या इतर लोकांनी चोराला पकडून निगडी पोलिसांना स्वाधीन केल्याने सोनाली कुलकर्णी हिच्या घरावर आलेले मोठा अनर्थ टाळले आहे. Attempted robbery at Sonali Kulkarni's house

सुशील कुमारच्या अडचणीत वाढ; आता नोकरीवरही फेरलं पाणी

या चोरी प्रकरणात निगडी पोलिसांनी अजय शेटे या चोराला ताब्यात घेतल आहे. अजय शेटे या चोरा कडून निगडी पोलिसांनी एक छोटा चाकु, एक डुप्लिकेट पिस्टल आणि एक पेपर स्प्रे  जप्त केले आहे. अजय शेटे हा बीड जिल्ह्यातील राहणार व्यक्ती असून तो खरंच सोनाली कुलकर्णीच्या चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला होता का, की त्यांचा उद्देश काही वेगळा होता ? याचा तपास निगडी पोलिस करत आहेत. 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live