लुडो, पब्जी, कॅरमनं केला घात, रिकामटेकड्यांच्या टाईमपासमुळे औरंगाबाद गॅसवर

माधव सावरगावे
बुधवार, 20 मे 2020
  • लुडो, पब्जी, कॅरमनं केला घात
  • पत्यांचा डाव, आयुष्यावर घाव
  • रिकामटेकड्यांच्या टाईमपासमुळे औरंगाबाद गॅसवर

औरंगाबादमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय.... त्यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलंय. लुडो, पब्जी, कॅरम आणि पत्यांचा डाव मांडल्यानं औरंगाबाद शहरात 25 टक्के रुग्ण वाढल्याचं स्पष्ट झालंय.

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होतं. सोशल डिन्सन्सिंगचं पालन करा असं वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत. त्यात आता भर पडलीय. ती लुडो, पब्जी, कॅरमसारख्या खेळांची..टाईमपास म्हणून औरंगाबाद शहरातल्या काही रिकामटेकड्यांनी खेळाचे डाव मांडले. हे कमी होतं म्हणून की काय मांडीला मांडी लावून पत्त्यांचा डावही रंगला आणि शेवटी व्हायचं तेच झालं. आजच्या घडीला एकट्या औरंगाबाद शहरातील 25 टक्के कोरोना रूग्ण या टाईमपासमुळे बाधित झाल्याचं समोर आलंय.
या रिकामटेकड्या मंडळींनी बांधकाम सुरू असलेल्या इमारती, पडकी घरं, गल्ली. मोहल्ले सगळीकडेचे डाव मांडले आहेत. ना तोंडाला मास्क, ना सॅनिटायझर..सोशल डिन्सन्सिंगचं तर विचारूच नका...आता उशिरा का होईना पण पालिकेनं अशा घोळक्यांवर कारवाई सुरू केलीय. 

संजयनगर, रामनगर, सातारा गाव परिसर, पुंडलिकनगर, हुसेन कॉलनी, बुढीलेन, रोशनगेट, कटकटगेट, सिल्कमिल कॉलनी, जयभीमनगर, भवानीनगर, जुना मोंढा, बहादूरपुरा या भागातील  25 टक्के बाधित हे पत्ते, कॅरम, लुडो, पब्जी हे खेळ खेळत असल्याचं आढळून आलंय.विशेष एकाच वाड्यातील 67 जणांना अशाच पद्धतीने कोरोनाची लागण झालीय.
 
टाईमपाससाठी मांडलेले खेळाचे डाव आता जिवावर उठतात की काय? अशी स्थिती आहे. कोरोनाच्या संकटाला अनेकांनी अजूनही गांभीर्यानं घेतलेलं नाही हेच यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे आता प्रशासनानंच आक्रमक पवित्रा घेत अशा बहाद्दरांना अद्दल घडवायला हवी. 


संबंधित बातम्या

Saam TV Live