मोठी अपडेट | औरंगाबाद पोलिसांनी शासन आदेश धुडकावला

माधव सावरगावे
शनिवार, 7 मार्च 2020
  • पोलिसांनीच शासन आदेश धुडकावला
  • पोलिसांकडून संगीत रजनी कार्यक्रमांचं आयोजन
  • कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचे सरकारचे आदेश

औरंगाबाद - कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी राज्यात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र औरंगाबादेत पोलिसांकडूनच हा आदेश पायदळी तुडवडण्यात येणार असल्याचं समोर आलंय.

हेही पाहा - #VIRALSATYA | होळीच्या रंगात कोरोना व्हायरस ?

औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी पोलिस कल्याण निधीसाठी आयोजित केलेली संगीत रजनी धुमधडाक्यात होणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेताल शासनाने सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे अनेक यात्रा,जत्रा, मोठ्या संख्येनं लोक एकत्रित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी अयोध्येत शरयू नदीवर आरती करणार नाहीत. मात्र, औरंगाबादेत शासनाचा हा आदेश पायदळी तुडवला जातोय.

हेही पाहा - #VIRALSATYA | दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही?

हेही पाहा - रामराम करा आणि कोरोना टाळा! कसा ते पाहा

 

यावरून नागरिकांच्या आरोग्याचे पोलिस विभागाला काही देणे-घेणे नाही, असं बोललं जातंय. उद्या, ८ मार्च रोजी महापालिकेने आयोजित केलेला मुशायरा रद्द करण्यात आला होता. मात्र पोलिसांना मात्र कोरोनाची कोणतीच धास्ती नसल्याची सध्या चर्चा रंगली आहे.  त्यामुळे पोलिसच किती बेजबाबदारपणे वावरत आहेत, असा सवाल औरंगाबादमध्ये उपस्थित केला जात आहे. 

 

चीन, इराकनंतर कोरोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. राज्यातील कोरोना संशयितांची संख्या 24 वर पोहोचली आहे. मुंबईत 16 तर पुण्यात चारजणं कोरोना संशयित आढळलेत. विविध रुग्णालयात त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. तर  नाशिकमधील कोरोना संशयितांची संख्या 2 वर पोहोचली आहे. याशिवाय नांदेड आणि सांगलीतही प्रत्येकी 1-1 कोरोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळे दीर्घकाळ ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरकडे जाण्यास दिरंगाई करु नका. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा. पाळीव प्राण्यांपासून दूर रहा असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय. तसंच केंद्राच्या निर्देशांनंतर राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला असे आदेश संबंधित विभागांना दिलेत.

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

aurangabad police dont care corona refused order from govt india maharashtra china viral viral 


संबंधित बातम्या

Saam TV Live