पिंपरी चिंचवड शहरातील ऑटोक्लस्टर जम्बो कोविड सेंटर अखेर बंद

गोपाल मोटघरे
मंगळवार, 1 जून 2021

पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील ऑटोक्लस्टर जम्बो कोविड सेंटर, फक्त रुग्ण नसल्याचे कारण सांगून कोविड सेंटर बंद करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड : पुण्यातील Pune पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad शहरातील ऑटोक्लस्टर जम्बो कोविड सेंटर Auto Cluster Jumbo Covid Centre फक्त रुग्ण नसल्याचे कारण सांगून कोविड सेंटर बंद करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कोविड सेंटर मधील जवळपास  दीड - दोनशे जणांवर अचानकपणे बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. (The Auto Cluster Jumbo Covid Center in Pimpri Chinchwad has been closed)

"स्पर्श" Sparsh या संस्थेकडून हे 200 बेड्सचे कोविड सेंटर चालवले जात होते, मात्र स्पर्श बाबत अनेक तक्रारी येत असल्याने आयुक्तांनी स्पर्श सोबत केलेला करार अखेर खंडित केला. स्पर्शच्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली होती. 

बारावी बोर्ड परीक्षांबाबत आज शिक्षणमंत्र्यांची बैठक; आज अंतिम निर्णय होणार 

मात्र, कोविडं  सेंटर बंद  करण्याआधी तेथील डॉक्टर्स आणि इतर कर्मचा-यांच्या सेवे बद्दल महापालिकेन काहीच नियोजन केले नाही. असे असतांना कुठलीही नोटीस न देताच कामावरून काढून टाकल्याने, संतप्त झालेल्या या कर्मचारी आणि डॉक्टर्सनी आता कोविड सेंटर बाहेरच ठिय्या आंदोलन Agitation सुरू केल आहे.

 

त्यामुळे या कर्मचाऱ्यांबाबत एकूणच प्रशासनाने घेतलेला निर्णय म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" अशा स्वरूपाची असल्याचे आता बोलले जात आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live