कमाई नसेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी जगवायचे कसे? रिक्षाचालकांनी व्यक्त केली चिंता 

तुषार रुपनवर
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आर्थिक कमाईवर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची पंचाईत होणार आहे. कमाई नसेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी जगवायचे कसे ? असा प्रश्न चालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

को असतानाही मिळालेल्या भाडेवाढीमुळे आधीच प्रवासी वर्ग दुरावला, आणि आता एकावेळी २ प्रवासी घेण्याची मर्यादा यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या अडचणींत वाढच होणार आहे. वाहनांचे हप्ते, शैक्षणिक खर्च, घरातील दैनंदिन खर्च हे आणि असे अनेक खर्च कायम मागे असतात. आणि वरून आर्थिक कमाईवर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची पंचाईत होणार आहे. कमाई नसेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी जगवायचे कसे ? असा प्रश्न चालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.  Auto rickshaw Taxi drivers spoke about lockdown conditions 

राष्ट्रीय लॉकडाउननंतर Lockdown स्वयंरोजगाराचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले. यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी चालकांचे प्रयत्न होते. यातच आता पुन्हा राज्यात लॉकडाउन लागू  करण्यात असल्यामुळे रिक्षा-टॅक्सी Rikshaw Taxy चालक हतबल झाले आहेत. कोरोना रोखण्यासाठी निर्बंध Rules असणे ठीक आहे पण आमच्या रोजीरोटीचे काय? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. पुढचे  येणारे काही दिवस अडचणींचे असतील, अशी हळहळीची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने State Government १५०० रूपयाचं पॅकेज रिक्षा चालकांना दिल आहे. हि त्यांच्यासोबत केली गेलेली थट्टाच आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा खरेदीसाठी जे कर्ज घेतल आहे. ते कर्ज व्याजासह माफ केले पाहीजे. मात्र रिक्षा चालकांच्या कर्जाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालक संकटात आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live