आपोआप गायब होणार ‘व्हॉट्‌सॲप मेसेज’

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

लॉस एंजेलिस - व्हॉट्‌सॲप हे मेसेजिंग ॲप लवकरच आणखीन एक नवीन फीचर आपल्या वापरकर्त्यांसाठी विकसित करत असून, काही काळानंतर आपोआप नष्ट होणारे मेसेज हे या नवीन फीचरचे वैशिष्ट्य असेल. आता ‘व्हॉट्‌स ॲप डिसॲपिअरिंग मेसेज’ ही सोय उपलब्ध होणार आहे. 

हे फीचर प्रथम व्हॉट्‌सॲप ॲण्ड्रॉइड व्हर्जन २.१९.२७५ वर उपलब्ध करण्यात आले होते. सध्या हे फीचर ‘बीटा’ व्हर्जनवर निवडक यूजर्ससाठी उपलब्ध आहे. ज्या वापरकर्त्यांना संवेदनशील आणि गुप्त संदेश पाठवायचे असतात, अशा यूजरना याचा जास्त फायदा होईल, असे व्हॉट्‌सॲपच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारचे फीचर पूर्वी टेलिग्राम या मेसेजिंग ॲपने वापरात आणले होते.आपला संदेश किती काळ दिसावा, याचा कालावधी ठरवता येईल. यासाठी पाच सेकंद अथवा एक तास अशी कोणतीही वेळ ठरवता येईल. वेळ निवडल्यानंतर तो पर्याय सर्व मेसेजला लागू होईल. सध्या हे फीचर केवळ ‘ग्रुप चॅट’पुरतेच उपलब्ध आहे. 

Web Title: Automatically delete WhatsApp message

संबंधित बातम्या

Saam TV Live