अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे आणि भाऊ अनिल तटकरे शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. अवधूत तटकरे यांनी अगोदर देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती तेव्हापासून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.  

सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने अवधूत तटकरे हे हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याने त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आमदार अवधूत तटकरे हे रोह्याचे माजी नगराध्यक्ष देखील आहेत.

महत्वाची बाब म्हणजे 2016 ला अवधूत तटकरेंच्या भावाने ही शिवसेनेत प्रवेश केला होता.अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे श्रीवर्धनचे आमदार असून युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्याने अवधूत यांचा कल शिवसेनेकडे आहे. तटकरे पिता-पुत्रांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो रायगडमधील राष्ट्रवादीला मोठा झटका असणार आहे.

Web Title: avdhoot tatakare  On the way to Shiv Sena

संबंधित बातम्या

Saam TV Live