शहर वाहतूक पोलिसांकडून गाणे गाऊन कोरोनाबाबत जनजागृती

police song
police song

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना या लॉकडाऊनच्या Lockdown काळात घरी राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक या आवाहनकडे दुर्लक्ष करून शहरात भटकंती करीत असल्याचं दिसून येत आहे. अशा नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे Police administration विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून समजविण्याचा प्रयत्न अमरावती Amravati शहरात केला जात आहे.  Awareness about corona by singing

शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे अनोख्या पद्धतीने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये कोरोनाची जिवंत प्रतिकृती तयार करून जनजागृती केल्यानंतर जयस्तंभ चौक jaistambh chowk येथे ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देणारी गाणी गाऊन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त किशोर सूर्यवंशी Kishor Suryawanshi यांनी जनजागृती Awareness केली.

या गाण्याच्या माध्यमातून कोरोनाची परिस्थिती नागरिकांपुढे मांडली तसेच विनाकारण घराबाहेर न पाडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कच्या नियमित वापराबाबत यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले. नेहमी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस कोरोनाच्या या कठीण काळात नागरिकांना अत्यंत संयमाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत असून नागरिकांनीही या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. Awareness about corona by singing

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com