दुधगावचे रस्ते कोरोनाच्या चित्राने बोलू लागले

विजय पाटील
सोमवार, 10 मे 2021

शिवशंभो झांज पथकच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या दुधगाव मधील चौकाचौकांमध्ये कोरोना विषयी जनजागृतीचे चित्रे आणि सुलेखन करून दुधगाव मध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर 'कोरोना हरेल जग जिंकेल' अशी चित्र रेखाटली आहेत.

सांगली : शिवशंभो झांज पथकच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या Sangli दुधगाव Dudhgaon मधील चौकाचौकांमध्ये कोरोना Corona विषयी जनजागृतीचे Awareness चित्रे आणि सुलेखन करून दुधगाव मध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर 'कोरोना हरेल जग जिंकेल' अशी चित्र paintings रेखाटली आहेत. Awareness about Corona through Paintings

या कामास सुलेखनकार  अमोल टकले, दिनकर टकले, राजाराम हराळे, आकाश हराळे,  यांनी दोन टीम मध्ये सहभाग घेऊन गावामध्ये कोरोना विषयी जनजागृतीचे पेंटिंग करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

या चित्रांच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्व विशद करतानाच लस घेण्याकरता पुढे येण्यास आवाहन करण्यात येत आहे. तसेच गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे ग्रामस्थांनी बाहेर पडू नये खबरदारी घ्यावी असा संदेश या पेंटिंग द्वारे देण्यात येत आहे.

रायगडमध्ये कोरोना काळात उतमात ; गोदामाबाहेरील हजारो टन धान्याची नासाडी

शिवशंभो झांज पथक नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढे राहून गावच्या विकासासाठी हातभार लावत आहे. या पेंटिंगसाठी दुधगाव ग्रामपंचायतचे देखील सहकार्य लाभले आहे. Awareness about Corona through Paintings

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live