बेजबाबदार नागरिकांना चिमुकल्या पोलिसांचा धसका..!

चेतन इंगळे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

वसईतल्या बहीण-भावाची पोलीस बनून जनजागृती चालू आहे. पून्हा लॉकडाऊन नको असल्याने चिमुकले बेजबाबदार नागरिकांना ते नियम शिकवत आहेत.  

वसई :  महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (Corona) आकडा वाढत आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉट मधून असलेले जिल्हे कमी होऊन पुन्हा त्याच दिशेने जात आहेत. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यात कोरोना पसरण्याची गती हळू हळू वाढत आहे. एकूणच काय तर आपण सर्व पुन्हा कडक लॉकडाऊन (Lockdown) कडे आपली पावले वळवत आहोत. Awareness of Corona by siblings  becoming a policeman  in Vasai

कोरोना काळामध्ये प्रशासन वेगवेगळे उपाय सुचवत आहे पण वयाने मोठ्या जनतेला त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. स्वतःचे संरक्षण कसे करावे आता हे आपल्यला लहान मुलांकडून शिकावे लागणार आहे. 

याचे एक उदाहरण म्हणजे वसईतले (Vasai) बहीण-भावाची जोडी पोलीस (Police) बनून जनजागृती करत आहेत. वसई विरार शहरात कोरोनाचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र बेजबादार नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी कोरोनाबाबत जनजागृती ते सध्या वसईतल्या गर्दीच्या ठिकाणी दोन छोटे पोलीस बनून जागोजागी फिरून करत आहेत.. Awareness of Corona by siblings  becoming a policeman  in Vasai

स्थानक परिसर असेल किंवा भाजी मार्केट सारख्या गर्दीच्या  ठिकाणी अनेकजण मोकळेपणाने विनामास्क फिरताना दिसून येतात. नागरिकांच्या या बेजवाबदार वागण्यामुळे शहरात  रुग्णसंख्येत वाढ होत असून शहराची वाटचाल पुन्हा लॉकडाऊन कडे होऊ लागली आहे.. त्यामुळे  वसई गावात राहणारे जीत वर्तक आणि रीत वर्तक हे दोन चिमुकले बहीण भाऊ पोलीस बनून  बेजबाबदार नागरिकांना नियम पाळण्याचे धडे देत आहेत. 

Edited by- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live