उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतल्या सामूहिक आरतीवर कोरोनाचे सावट?

सरकारनामा
गुरुवार, 5 मार्च 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र या वेळी कोरोना व्हायरसची भिती लक्षात घेऊन अयोध्येत सामुहिक आरती होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र या वेळी कोरोना व्हायरसची भिती लक्षात घेऊन अयोध्येत सामुहिक आरती होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे दुपारी श्रीरामाचं दर्शन घेऊन, संध्याकाळी शरयू आरती करतील अस ठरले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्याचेही आवाहन शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाच्या भितीने लोक एकत्र जमणे योगन्या नाही असे ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे शरयू नदीची सामुहिक गंगा आरती टाळावी, असा विचार ठाकरे पितापूत्रांनी संजय राऊत यांच्या कानावर घातला आहे. 

 

हेही वाचा ::  दीड लाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित

हे नक्की वाचा : धक्कादायक! कोरोनामुळे एका झटक्यात जीव जातो कसा ते पाहा

मात्र, योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करु असे आश्वासन राऊत यांनी ठाकरे यांना दिले आहे. मात्र, संसर्गजन्य आजाराची भिती वाढल्यास अयोध्येकडे फिरकू नका असे ऐनवेळी सांगितले तर जाणार नाही ना या भितीने शिवसैनिकांना ग्रासले आहे. 

29 नोव्हेंबर रोजी राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापना केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. याची घोषणा अगोदरच करण्यात आली आहे. 

 

WebTittle : Ayodhya Mass Prayer may be hampred due to Corona


संबंधित बातम्या

Saam TV Live