5 मार्चपर्यंत येडियुरप्पा होणार मुख्यमंत्री!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा येत्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील, असा दावा दोन ज्योतिषांनी केला आहे. गणेश हेगडे आणि पवन जोशी अशी या दोन ज्योतिष्यांची नावे आहेत. येत्या 5 मार्चपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री बनतील, असेही या ज्योतिषांनी सांगितले आहे.  

येडियुरप्पा येत्या 5 मार्चपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाही तर आपण ज्योतिष सांगणे बंद करेन. आपण येडियुरप्पा यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला असून, मार्चपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री बनतील असे झाले नाहीतर आपण ज्योतिष सांगणे बंद करु, असे या दोघांनी सांगितले आहे. 

दरम्यान, या ज्योतिष्यांनी यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार स्थापन करतील ही आपली भविष्यवाणी खरी ठरली.

Web Title: B S Yeddyurappa will be the chief minister till March 5

संबंधित बातम्या

Saam TV Live