आरोग्यमंत्र्यांनी हवेतून आॅक्सिजन शोधणारा प्लँट कुठे शोधला?....

लक्ष्मण सोळुंके
बुधवार, 14 एप्रिल 2021

आरोग्यमंत्र्यांनी हवेतून ऑक्सिजन शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं ? मला माहित नाही असा प्रश्न उपस्थित करत हवेतून ऑक्सिजन शोषणारा प्लँटबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. अशी टिका बबनराव लोणीकर यांनी केली. 

जालना: आरोग्यमंत्र्यांनी हवेतून ऑक्सिजन Oxygen Plant शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं ? मला माहित नाही असा प्रश्न उपस्थित करत हवेतून ऑक्सिजन शोषणारा प्लँटबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. अशी टिका राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर Babanrao Lonikar यांनी राजेश टोपे Rajesh tope यांच्यावर केली आहे.

लोणीकर यांनी आज जालन्यात Jalana  पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात दररोज एक लाख लोक कोरोनाबाधित Corona होत असून दररोज सरासरी ५०० कोरोना बाधितांचा मृत्यू होतोय. रुग्णांना ऑक्सिजन, बेडस आणि इंजेक्शन मिळत नाही तसेच  गोरगरिबांना औषधोपचार  सुद्धा मिळत नाहीत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्य सुविधा देण्यात नापास झाल्याची धारदार  टिकाही लोणीकरांनी टोपेंवर केली आहे. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला State Government  पूर्णपणे अपयश आलं असून देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याचा दावा देखील त्यांनी केला. Babanrao Lonikar criticizes Rajesh Topes Oxygen Plant concept

काय म्हणाले होते राजेश टोपे?
ऑक्सिजन जनरेशन प्लांट टाकण्याचा सल्ला आम्ही दिला होता. गडहिंग्लज Gadhinglaj, कोल्हापूर Kolhapur इथे असा प्लांट उभारण्यात आला आहे. 150 बेडेड हॉस्पिटल यावर आरामशीर चालू शकते. तब्बल 300 जम्बो सिलेंडर दररोज भरु शकतात. याची किंमत जरा जास्त आहे. तब्बल 80-85 लाखांच्या घरात या ऑक्सिजन प्लांट ची किंमत आहे. या ऑक्सिजन प्लांट ला  15 दिवस इन्स्टॉलेशन करण्यास लागतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जरुर असा प्रयत्न करु असं सांगितल्याची माहीती  राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर माध्यमांना दिलेली होती. त्यावरून लोणीकरांनी टोपेंवर निशाणा साधला

Edited By- Sanika Gade 


संबंधित बातम्या

Saam TV Live