बेबीडॉल फेम कनिका कपूरला कोरोनाची लागण, पार्टीत अनेकांना संसर्ग?

ब्युरो रिपोर्ट
शुक्रवार, 20 मार्च 2020

बेबी डॉल सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण झालीय. अलिकडेच कनिका लंडनमधून आली होती. विशेष म्हणजे लंडनहून परतल्यानंतर तिनं मोठी पार्टी देखील दिली होती. 

उत्तर प्रदेश - बेबी डॉल सिंगर कनिका कपूरला कोरोनाचा बाधा झालीय. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. 15 मार्चला कनिका लंडनहून लखनऊमध्ये आली होती. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीनं ती वॉशरूममधून लपत छपत बाहेर पडली. इतकंच नाही तर तिनं रविवारी आपल्या लखनऊमधल्या गॅलेंट अपार्टमेंटमध्ये एक पार्टी देखील आयोजित केली होती. ज्या पार्टीत लखनऊमधील बडे अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळीदेखील सहभागी जाली होती. आता कनिकाला कोरनाचा झाल्याची बातमी पुढे आल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकलीय.

 

विशेष म्हणजे लंडनमधून परतल्यानंतर कनिका लखनऊमधल्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. त्यामुळे आता सर्वांचीच धावाधाव सुरू झालीय. कनिकाच्या कुटुंबांचं विलगीकरण करण्यात आलंय. तर तिच्या अपार्टमेंटमधील बऱ्याचशा लोकांनी घर सोडलंय. आता कनिकाच्या पार्टीत कोण कोण होतं, लखनऊमध्ये ती कुणा कुणाच्या संपर्कात होती याच शोध घेणं हेच मोठं आव्हान यंत्रणांपुढे आहे. 

insta - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s a beautiful life!! Make the most of it ... Here’s to new beginnings #sttropez #summer2019

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

insta - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

कोण आहे कनिका कपूर?

कनिका कपूर ही पॉप सिंगर आहे. पंजाबी गाण्यांसाठी ती प्रसिद्ध आहे. स्टेज शो आणि लाईव्ह कॉनसर्टसाठी कनिका अनेकदा परदेश दौरे करत असते. 

insta - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

insta - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

कनिकामुळे अनेकांचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन यंत्रणेसमोरचं आव्हान आणखी वाढणार आहे. विमानतळावर जर कनिका कपूर योग्यरितीने बाहेर पडली असती, तर कदाचित तिला झालेला कोरोना लगेच तपासणीत समोर आला असता. मात्र गैरपर्वाईमुळे कनिकाला झालेला कोरोनाचा संसर्ग आता आणखी पसरला असेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

insta - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

सध्या कनिकावर उपचार सुरु असून, तिच्या प्रकृतीसाठी चाहत्यांनीही प्रार्थना  केली आहे. 

हेही वाचा - कोरोनामुळे देशाच्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत?
हेही वाचा - अमेरिकेत मलेरियाचं औषध कोरोनावर देणार, आणि भारतात?
हेही वाचा - महत्त्वाच्या शहरात ९० टक्के लॉकडाऊन, उद्धव ठाकरेंचे आदेश

 

baby-doll-singer-kanika-kapoor-tests-coronavirus-positive-she-hid-travel-history-threw-party-at-5-star


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live