देव तारी त्याला कोण मारी!; अर्धा तास बोरवेलमध्ये पडून असलेले बाळ सुखरुप बाहेर

मंगेश मोहिते
शुक्रवार, 11 जून 2021

बाळास रस्सीला हात पकडण्यास सांगितले. आणि मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढले. अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले.

थरकाप उडवणारी घटना रामटेक तालूक्यातील शिवनी भोंडकी येथे घडली. शिवारात खेळत असतांना दोन वर्षाचा बाळ  बोरवेलमध्ये पडला. प्रसंगावधान साधून गावकऱ्यांनी त्या बाळास मोठ्या शिताफीने सुखरूप बाहेर काढले.नवघान देवा दोंडा (वय २) असे त्या बाळाचे नाव आहे. नवघानचे वडील शिवारात जनावरे चारत होते. त्याबरोबरच त्याचे मुलं देखील खेळत होते. खेळता खेळता शेतातील एका बोरवेलच्या खड्ड्यात नवघान पडला. इतर मुले रडत होते.(The baby lay in the borewell for half an hour but was safely out)

मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील घटनास्थळी पोहचले. आईवडिलांचा हंबरडा ऐकून गावातील लोकं घटनास्थळी दाखल झाले. जवळपास अर्धा तासापासून ते बाळ पडून होता. गावातील अपघात ग्रस्त रक्षक क्रिष्णा पाटिल,यादोराव शेंडे, शंकर शेंडे,महादेव पाटिल,अमोल वैद्य ,अक्षय गभणे तसेच गावातील नागरिक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. बोरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. टॉर्च लावून बाळाशी संपर्क साधला. एखाद्या बॉलिवूड चित्रपटातील दृश्य चालू असल्याचे चित्र होते. पन्नास फुट खोलवर असलेल्या बोरवेलच्या खड्ड्यात दोर (रस्सी) टाकली.

हे देखील पाहा

बाळास रस्सीला हात पकडण्यास सांगितले. आणि मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढले. अर्धा तास शर्थीचे प्रयत्न चालले. याबाबतची कल्पना प्रशासनास नाही. मात्र गावकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने हा थरार प्रसंग केला. जेसीबी येण्यास उशीर झाला. अखेर मोठ्या हिंमतीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. 

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर...

अपघात ग्रस्त रक्षक क्रिष्णा पाटिल यांनी सांगितले की आज पर्यत आम्ही फक्त टि.व्ही वरच असे पाहत आलो पण आज प्रत्यक्षात असे अनुभव अनुभवायला देखील  मिळाले. स्वताची जिद्द आणि चिकाटी असेल तर यमराज ही प्राण घेऊ शकत नाही म्हणुन "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा परिसरातील नागरिकांना अनुभव पहायला मिळाला.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live