बच्चू कडू यांनी स्वयंपाकाच्या कानशिलात लगावली; शासकीय रुग्णालयात निकृष्ट जेवण

bachchu kadu
bachchu kadu

अकोला: अकोल्यात (Akola) पुबच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा रुद्र अवतार न्हा पाहायला मिळाला. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical Collage) सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल जात होते. त्यामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. (Bacchu Kadu slapped for Inferior meal in government hospital)

यावेळी बच्चू यांनी पाहणी केल्यावर येथील जेवणाची व्यवस्था पाहिल्यावर त्यांनाही संताप अनावर आला. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षीच्या जेवणाच्या खर्चाचा हिशेबाही तिथे त्यांच्याकडे नाही आणि रुग्णांना निकृष्ठ जेवण दिल जात. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर बच्चू कडू यांनी आपलं रौद्ररूप दाखवलं आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या खानसामाला चांगलाच चोप दिला

होणारा धान्याचा पुरवठा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, यासंदर्भात माहिती देताना संबंधित कर्मचाऱ्याने मूग आणि तूर डाळ मिळून दररोज 23 किलो लागत असल्याचे सांगितले. बच्चू कडू यांनी हाच प्रश्न तिथल्या स्वयंपाकीला देखील विचारला असता त्यांनी दोन्ही डाळी मिळून आठ ते दहा किलोंचा उपयोग होत असल्याचं म्हटलं. स्वयंपाकीला  त्यांनी पुन्हा एकदा विचारल्यानंतर त्याने सांगितलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आली आणि मग त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी स्वयंपाकीच्या कानशिलात लगावली.

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com