बच्चू कडूंनी केली कोविड सेंटरची पाहणी

जयेश गावंडे
शनिवार, 1 मे 2021

जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांची सोय  असणारे कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले आहे. राज्याचे  राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

अकोला :  जिल्ह्यातील कोविड Corona संसर्गाची स्थिती पाहता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांची सोय  असणारे कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले आहे. राज्याचे  राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांनी आज या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली. Bacchu Kadu visited Covid Center in Akola

जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या पाहता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरक व्यवस्था करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात आहे. त्याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे नियोजन असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर ऑक्सिजन सुविधेसह सुरु करण्यात येत आहे. 

सद्यस्थितीत येथे १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ही खाटांची संख्या वाढविता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  हे सेंटर येत्या सोमवार पासून कार्यान्वित होणार असून त्या दृष्टीने करण्यात आलेल्या सज्जतेचा पालकमंत्री ना. कडू यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live