...ही तर कलंकशाहीची औलाद - बच्चू कडू

Saam Banner Template (40).jpg
Saam Banner Template (40).jpg

अकोला - मोदीजी नेहमी म्हणतात 'मेक इन इंडिया, मेड इन इंडिया' Made In India हे ब्रीद वाक्य शेती उत्पादनात का वापरत नाही. हे फक्त अंबानी, अडाणीसाठीच वापरता का. ही नालायकी आहे. सरळ सरळ महात्मा फुले Mahatama Phule यांच्या म्हणण्यानुसार कलंकशाहीची औलाद आहे, असा घणाघात राज्यमंत्री बच्चु कडू Bachchu Kadu यांनी केला आहे.  सरकारने तुरच नाही तर मुंग, उडीद डाळ आयात केली आहे. शेतकऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे, असेही ते म्हणाले. Bachchu Kadu statement on central government

देशात 43 लाख टन तुरीची आवश्यकता आहे. वर्षभर आपल्याला तेवढी डाळ आहे. तेवढी डाळ आपल्याकडे उपलब्ध आहे. इतकं सगळं असताना आपल्याकडे यावर्षी 38 लाख टन डाळ उत्पादन होईल. यावर्षी आपल्याकडे डाळ शिल्लक आहे.

सध्या सरकारने 8 ते 9 लाख टन डाळ मोझांबीक या देशातून आयात केली. कारण नसताना तूर बोलाविली. जर आयात केली नसती तर तुरीचे भाव दहा हजाराच्या जवळ असती. पेरणीच्यावेळी शेतीमालाचे भाव वाढत असतात. परंतु, यावर्षी भाव कमी होत आहे. हे यावर्षी उलट होत असताना दिसते. याचा परिणाम हे केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळे आहे, असेही ते म्हणाले. Bachchu Kadu statement on central government

मोदीजी नेहमी म्हणतात 'मेक इन इंडिया, मेड इन इंडिया' हे ब्रीद वाक्य शेती उत्पादनात का वापरत नाही. हे फक्त अंबानी, अडाणीसाठीच वापरता का. ही नालायकी आहे. सरळ सरळ महात्मा फुले यांच्या म्हणण्यानुसार कलंकशाहीची औलाद आहे. सरकारने तुरच नाही तर मुंग, उडीद डाळ आयात केली आहे. शेतकऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे, असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com