VIDEO: मागासवर्गीय मुलाला झाडाला बांधून मारहाण, अंगावर केली लघुशंका

संजय जाधव
मंगळवार, 8 जून 2021

जळगाव खान्देश जिल्ह्यात एका दलित मुलाला झाडाला बांधून मारहाण करीत अंगावर लघुशंका केल्याची घटना आज घडली आहे. या घटनेचे बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहे.

बुलढाणा  - जळगाव Jalgaon खान्देश जिल्ह्यात एका मागासवर्गीय मुलाला झाडाला बांधून मारहाण करीत अंगावर लघुशंका केल्याची घटना आज घडली आहे. या घटनेचे बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात Maharashtra मागासवर्गीय लोकांवर होत असलेले अत्याचार अजूनही थांबले नाहीत, जळगाव खान्देश जिल्ह्यातील भडगाव Bhadgaon तालुक्यातील अंजनविहिर गावातील एका दलित मुलाने चार अंबयाच्या झाडाच्या कैऱ्या चोरल्या व त्याचा व्हिडिओ काढून शेत मालकाने व्हायरल सुद्धा केला. A backward class child tied to a tree and beaten

हे देखील पाहा

घटनेतील गुन्हेगारावर अ‍ॅक्ट्रोसिटी गुन्हे दाखल करीत तात्काळ अटक करावी अशी मागणी समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी केली आहे. तसेच यापुढे राज्यात पुन्हा अश्या घटना घडणार नाही यांची दक्षता राज्य सरकारने घ्यावी घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध करीत दोषिवर कडक कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने राज्यभर आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा अशांत वानखेडे  यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live