धक्कादायक - मलकापुरात दफन केलेले मृतदेह कुत्र्यांनी उकरले

Dog
Dog

बुलडाणा: बुलडाणा Buldhana जिल्ह्यातील मलकापूर Malkapur तालुक्यात नदी काठावर माता महाकाली वार्ड परिसरातल्या वैकुंंठधाम स्मशानभूमीत Crematorium भटक्या कुत्र्यांकडून दफन केलेले मृतदेह उकरुन काढले गेल्याचा धक्कादायक प्रकार 'साम टिव्ही'ने उघडकीला आणला आहे. 

याठिकाणी दफन करण्यात येणाऱ्या मृतदेहांची भटक्या कुत्र्यांकडून Stray Dogs विटंबना होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून होत आहे. शहरातील आणि परिसरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जावून त्याठिकाणी गाडण्यात आलेले मृतदेह उकरून काढण्या बरोबरच ते मृतदेह  फरफटत नेण्याचेही प्रकार घडत आहेत 

काही कुत्रे तर मृतदेहांचे लचके तोडून काढत असल्याचेही बाब समोर आल्याने जनभावना दुखावल्या जात आहेत. असेच काही प्रेतांचे सांगाडे हे या परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष सुध्दा व्यक्त केला आहे.

या स्मशानभूमीची नदी River पात्राकडील संरक्षक भिंतीची काही वर्षांपासून पडझड झाली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे.  भिंत पडलेली असल्यामुळे मोकाट फिरणारे कुत्रे तिथे सर्रास शिरतात. त्यामुळे तिथे असलेल्या अग्निसंस्कार केलेल्या आणि दफन केलेल्या प्रेतांचे मेल्यानंतरही हाल होत आहेत. या स्मशानभूमीमध्ये सर्वधर्मिय मृतदेहांवर अंत्यसंस्कार Funeral करण्यात येतात. यामध्ये अग्नीसंस्कार तसेच दफनविधीही होतो. 

आज हे वृत्त साम टीव्ही वर प्रसारित होताच मलकापुर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले व तातडीने नगरपालिका मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी स्मशानभूमीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात भटक्या कुत्र्यांकडून मृतदेह उकरुन बाहेर काढले जात असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट झाली. नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी ही जबाबदारी नगरपालिकेची असल्याचे सांगितले असून भविष्यात अशा घटना होणार नाही अशी ग्वाहीही  दिली. तशा सूचना पोलिस विभागाला सुद्धा देण्यात येतील असेही नगराध्यक्षांनी सांगितले 
Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com