केंद्रीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, वाचा निवृत्तीबाबत केंद्र सरकारनं दिलेले स्पष्ट संकेत

साम टीव्ही
बुधवार, 2 सप्टेंबर 2020
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी
  • वेळेपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिली जाऊ शकते निवृत्ती
  • निवृत्तीबाबत केंद्र सरकारनं दिले स्पष्ट संकेत
  • ज्येष्ठ केंद्रीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी आहे..केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वीच सेवेतून निवृत्त केलं जाऊ शकतं असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. याबाबतीत कोणतीही कुचराई केली जाणार नाही असा इशाराही केंद्र सरकारनं दिलाय.

ज्या कर्मचाऱ्यांचं वय 50 ते 55 आहे किंवा ज्यांचा कार्यकाळ 30 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियमानुसार निवृत्त करण्याचा अधिकार आहे असं केंद्र सरकारने मह्टलंय. अर्थात अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पैन्शनचे नियमही वेगळे असतील ते केवळ त्यांच्या 'परफॉर्मेंस रिव्यूवर आधारीत नसतील असंही सरकारनं म्हंटलंय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेऊन गरज वाटल्यास त्यांना सेवानिवृत्त केलं जाईल असं म्हंटलं होतं. कोरोनाच्या काळात सरकारला आर्थिक फटका बसलाय, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

सरकारनं नेमकं काय म्हंटलंय पाहूयात

केंद्र सरकारनं काय म्हंटलंय 
---------------------------------

  • कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्त केलं जाऊ शकतं
  • 50 ते 55 वय असलेल्या किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त सेवकाल पूर्ण करणाऱ्यांना दिली जाऊ शकते निवृत्ती
  • निवृत्तीबाबतचा सर्वस्वी अधिकार केंद्राला
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत वेगळे नियम

संबंधित बातम्या

Saam TV Live