बॅन चायना मोहिमेमुळे चीनमधील माध्यमांची भारताविरोधात गरळ

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020
  • बॅन चायना महिमेबद्दल चिनी ड्रॅगनचे फुत्कार
  • मोहीम यशस्वी होणार नसल्याची चीनची पोपटपंची
  • भारतीयांच्या निर्धाराचा दणका चीनला आता द्यायलाच हवा

भारतात सुरू असलेल्या बॅन चायना मोहिमेमुळे चीनचं पित्त खवळलंय. त्यामुळे चीन सरकार आणि तिथली माध्यमं भारताविरोधात गरळ ओकू लागलेयत. काय झालंय नेमकं पाहूयात या रिपोर्टमधून...

कोरोनाचं संकट आल्यापासून आणि भारतीय सीमेवर चीननं कुरापती सुरू केल्यापासून संपूर्ण भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळलीय. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या मोहिमेला बळ आलंय. त्यातच पंतप्रधान मोदींनी स्वावलंबी भारतचं आवाहन केल्यानंतर तर चिनी वस्तू टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीय करून लागलाय. त्यामुळे चिनी ड्रॅगनचं पित्त खवळलंय. चीन इतका वैफल्यग्रस्त झालाय की, बेताल वक्तव्य करतचीनकडून वारंवार भारताविरोधात गरळ ओकली जातेय. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम भारतात यशस्वी होणार नसल्याचा फुत्कार चीनकडून सुरू झालाय.

चिनी वस्तू भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनल्यायत, त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम भारतात अपयशी ठरेल असा जावईशोध चीननं लावलाय. चीनमधल्या सरकारी आणि खासगी माध्यमांनीही या रडगाण्यात सूर आळवलाय. एकप्रकारे भारतीयांच्या राष्ट्रप्रेमाला थेट आव्हान देण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे चिनी फुत्काराला उत्तर द्यायचं असेल तर, आपण चिनी वस्तू कचऱ्याच्या डब्यात टाकायला हव्यात. आणि भारतीयांनी जर निर्धार केला तर काय होतं हे पुन्हा एकदा चीनला दाखवून द्यायला हवंय. शेकडो वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना ज्या शौर्यानं आपण पिटाळून लावलं, त्याच धैर्यानं चिनी वस्तू हाकलून लावण्याची शपथ आपण घ्यायला हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live