VIDEO | बँकेंची तब्बल 17 कोटींची फसवणूक, पाहा कशी केली बँकेची फसवणूक

साम टीव्ही
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

करारपत्राचा भंग करून मुंबईतल्या एका कंपनीनं मिरजेतील बँक ऑफ बडोदाला 16 कोटी 97 लाखांचा चुना लावलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात

करारपत्राचा भंग करून मुंबईतल्या एका कंपनीनं मिरजेतील बँक ऑफ बडोदाला 16 कोटी 97 लाखांचा चुना लावलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात

सांगली जिल्ह्यातल्या बँक ऑफ बडोदाच्या मिरज शाखेकडे कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालाची परस्पर विल्हेवाट लावून 16 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर जगदीश पाटील  यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मार्च 2017 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडलाय.

मिरज शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सी. एन. एक्स. कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीनं बँक ऑफ बडोदाच्या मिरज शाखेकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. कर्जासाठी त्यांनी कंपनीच्या कोल्ड स्टोअरेजमधील माल तारण ठेवला होता. बँकेला पूर्वकल्पना दिल्याशिवाय तारण मालाची विक्री किंवा विल्हेवाट लावू नये, असा करार बँक आणि कर्जदारांमध्ये झाला होता. मात्र, मार्च 2017 पासून कर्जदारांनी कराराचं उल्लंघन करून तारण ठेवलेल्या मालाची परस्पर विल्हेवाट लावली.

बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच मिरज शाखेतील मॅनेजर जगदीश पाटील यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी सी.एन.एक्स.कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक निरुपमा पेडुरकर आणि इतर सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. ही फसवणूक थोडी थोडकी नसून तब्बल 16 कोटी 97 लाख रुपयांची आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live