बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली होती. परंतु, बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १० बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याला विरोध म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. संपावरून अर्थसचिव राजीव कुमार आणि बँक कर्मचारी संघटनेच्या नेत्यांत चर्चा झाली. सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केल्याने आम्ही पुकारलेला संप मागे घेत आहोत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिली आहे. बँक अधिकाऱ्यांच्या चार संघटनेने २६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या संपाची घोषणा दिली होती. बँकांच्या विलीनीकरणानंतर ११ वा वेतन करार लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

२५ सप्टेंबरच्या मध्यरात्री ते २७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बँक कर्मचारी संपावर जाणार होते. या संपात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन, इंडियन बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गेनेशन बँक ऑफिसर्स या संघटनेचा समावेश होता. बँकांचा संप मागे घेण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Web Title bank strike slated for 26 and 27 september stands deferred
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com