बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतींचा कल्याणच्या ग्रामीण भागात धुरळा

Bullock Cart Race
Bullock Cart Race

कल्याण : ग्रामीण भागात गेल्या बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतींचा Bullock  Cart Race धुरळा पुन्हा उडण्यास सुरुवात झाली आहे. काकडवाल येथील बैलगाडा शर्यतीचा प्रकार ताजा असतानाच, उसाटने गावाच्या शिवारातील माळरानावर रविवारी Sunday पुन्हा बैलगाडीच्या शर्यतीचा धुरळा उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. Banned Bullock Cart Races organised in Kalyan Rural Area

या प्रकाराचा व्हीडिओ Video आता व्हायरल झाला आहे. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाने Corona हाहाःकार माजवला असताना उसाटने गावच्या शिवारात मात्र सर्रास बैलगाडा शर्यती आयोजिती केल्या जात आहेत आणि शर्यती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

मलंगगड भागात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढले आहेत. मात्र असं असताना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रास पणे बैलगाडी शर्यती आयोजित केल्याची माहिती काही ग्रामस्थांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे. 

याआधी देखील काकडवाल गावात शर्यती आयोजित झाल्या होत्या. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा उसाटने गावच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले होते. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन पोलीस करत असताना दुरीकडे मात्र बैलगाडा शर्यती आयोजक मात्र नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे. Banned Bullock Cart Races organised in Kalyan Rural Area

लाखो रुपयांची बोली शर्यतींमध्ये होत असल्याने सध्या पोलीस देखील दुर्लक्ष करत असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. मात्र पोलिसांचं हे दुर्लक्ष ग्रामीण जनतेच्या जीवावर उठण्याची चिन्हे दिसून येत आहेत.त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात लक्ष घालणार का हे पहावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com