निकालाआधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात दोडके समर्थकांच्या या विश्वासाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 50 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर होत्या. या पार्श्वभूमीवर दोडके समर्थकांचे विजयाचे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.

येथे भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे दोडके यांच्यात सरळ लढत झाली. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र पक्षाचे नेते एकमेकांचे पाय ओढत असल्याने येथे विजय मिळत नसल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र दोडके समर्थकांना यावर मात केल्याचा विश्वास असून त्यांनी निकालाच्या आधीच जल्लोषाची तयारी केली आहे.
WebTitle :Banner of NCP candidate victory before the outcome

संबंधित बातम्या

Saam TV Live