मी पस्तावतोय या मुख्यमंत्र्यांच्या बॅनरमुळे कोल्हापूरात चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (मंगळवार) कोल्हापूरात जाणार असून, त्यापूर्वीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मी पस्तावतोय म्हणत विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज, हॉकी स्टेडिअम, गोखले कॉलेज, सर्किट हाऊस येथे हे बॅनर लावण्यात आले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरुन सरकारविरोधी हे बॅनर लावण्यात आले आहेत. पाकिस्तानी कांदा आयात करून, राज्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर, मी पस्तावतोय फसवी कर्जमाफी द्यायला, मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला, पक्षात येता की ईडी पाठवू अशा आशयाच्या बॅनरमुळे कोल्हापुरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर कोल्हापुरात लागले असताना, या आशयाच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोल्हापुरातून आज ही यात्रा कोकणात जाणार आहे. 

Web Title: banners against CM Devendra Fadnavis in Kolhapur
 
संबंधित बातम्या

Saam TV Live