बाप्पा येणार पण शांतपणे ....!  

बाप्पा येणार पण शांतपणे ....!  

मुंबई : मुंबईतील परिस्थिती सध्या दिवसेंदिवस बिकट होत असून,तिचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आलाय. करोनामुळे आगामी गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असले,तरी उत्सव होणारच याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ठाम आहे. 

अनेक नामांकित मंडळांनी  वाट पाहण्याची भूमिका घेतली असली, तरी अनेक छोट्या मंडळांकडून, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मूर्तीबाबत विचारणा केली जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मात्र, शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे मूर्तिकारांच्या कार्यशाळांतील लगबग देखील सध्या शांत आहे. 
मुंबईतील संचारबंदी कधी शिथिल होईल,याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये चलबिचल सुरू आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते हे सर्वश्रुत आहे. प्लेगची साथवगळता गणेशोत्सव काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. मात्र, मुंबईचा गणेशोत्सव नेहमीच थाटामाटात साजरा झालेला पाहायला मिळाला आहे. मात्र, यंदा करोनाने जगभर घातलेला धुमाकूळ पाहता, एकूणच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. 
 
गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून, गर्दीमुळे करोनाचा संसर्ग लक्षात घेत भाविकांसह, कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही. यापूर्वीदेखील मुंबईतील गणेशोत्सवाने अनेक कठीण प्रसंगांमध्ये सामाजिक भान जपले आहे. गतवर्षीची अतिवृष्टी असो वा २६ जुलैचा महापूर, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.यंदाही ही परंपरा मंडळांनी कायम राखली आहे. मागील काही दिवसांत पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. अशावेळी ऐन गणेशोत्सवात याच सामाजिक जाणिवेतून गर्दी टाळण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत,' असे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. तसेच परिस्थिती सुधारल्यास, शासनाच्या मान्यतेनेसर्व नियमांचे पालन करीत निश्चितच सण थाटामाटात साजरा करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडे वारंवार विचारणा होत असून, समितीस्तरावर मोठ्या प्रमाणात खलबते सुरू आहेत. या चर्चांअंती, 'मुंबईवर ओढवलेले संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. 

WebTittle ::  Bappa will come but quietly ....!


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com