बारामतीतला वाढता कोरोना अजितदादा कसा रोखणार?

मंगेश कचरे
रविवार, 4 एप्रिल 2021

बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे नियंत्रण मिळवण्यासाठी शेवट प्रशासनाला कडक निर्बंध लावावे लागणार आहेत.

बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे नियंत्रण मिळवण्यासाठी शेवट प्रशासनाला कडक निर्बंध लावावे लागणार आहेत.

बारामतीत (Baramati) एका दिवसात कोरोना पॉझिटिव्ह 238 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे बारामतीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज बारामतीच्या स्थितीबाबत बैठक घेतली आहे. Baramati Corona Cases Rising Challege before Ajit Pawar

हे देखिल पहा

बारामती शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत नसल्याने प्रशासनची व नागरिकांची झोप उडाली आहे.  बारामतीत  तब्बल 238 जण पॉझिटीव्ह सापडल्याने आज पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. बारामतीतील रुग्णसंख्येत सध्या तब्बल दोनशेचाच टप्पा गाठल्याने आता काय करायचे याचा प्रश्न प्रशासनापुढे पडला आहे. 

आतापर्यंत बारामतीत 10155 रुग्ण आढळले आहेत.  यापैकी 167 मृत्यू तर 8365 बरे झाले आहेत, यामुळे बारामतीकरांना आता खरी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र बारामतीकर नियमांचं पालन करताना नसताना दिसत नाहीत.

Edited By- Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live