बारामतीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो... (पहा व्हिडीओ)

मंगेश कचरे
मंगळवार, 25 मे 2021

बारामती मध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर कडेला ठिकठीकाणी टमाटर फेकून दिलेले आहेत. कारण या शेतकऱ्यांना एका नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नवं संकट यांच्यावर ओढवलेल आहे. टोमॅटो वर पडलेला कुकुर बोजा हा रोग समोर आला आहे. आणि याचा परिणाम टोमॅटो वर होऊन तो पिवळा पडत आहे. 

बारामती : बारामती Baramati मध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर कडेला ठिकठीकाणी टमाटर  Tomatoes फेकून दिलेले आहेत. कारण या शेतकऱ्यांना एका नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट  ओढवलेल आहे. टोमॅटो वर पडलेला कुकुर बोजा हा रोग समोर आला आहे. आणि याचा परिणाम टोमॅटो वर होऊन तो पिवळा पडत आहे. In Baramati farmers throw tomatoes on the road

या रोगामुळे टोमॅटो पिकाचे खूप मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. आणि या रोगामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त टोमॅटो उत्पादकांना फेकून द्यावा लागत आहे. एकीकडे टमाटर वर रोग पडलेला आहे तर दुसरीकडे त्याला भाव मिळत नाही. आणि त्यामुळे सुद्धा शेतकरी हवालदिल झालेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे, त्यामुळे टोमॅटोच्या व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. 

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण 

त्यामुळे टोमॅटोला अडीच रुपये आठ रुपये प्रति किलो असा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील Junnar Agricultural Market Committee नारायणगाव टोमॅटो हा खुल्या पद्धतीने आणि रोख पैसे यामुळे राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र खरेदीसाठी व्यापारी बाजारात फिरकले नसल्याने बाजार मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जुन्नर Junnar, आंबेगाव Ambegon, संगमनेर Sangamner तालुक्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live