बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंतच व्यवहार सुरु राहणार

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

शहर व तालुक्यातील कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून बारामतीत (Baramati) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच व्यवहार (Transactions) सुरु असतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.  बारामती शहर व तालुक्याला हा नियम लागू असेल.

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून बारामतीत (Baramati) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच व्यवहार (Transactions) सुरु असतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. Baramati Market will be open from Nine am to Six PM pm 

बारामती शहर व तालुक्याला हा नियम लागू असेल. मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जीम हे पुढील सात दिवस बंद असतील. सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील. 

दरम्यान बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी (Curfew) तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असेल, असेही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे. कोविड लसीकरणासाठी (Vaccinations) जाणा-यांनाही सूट दिली जाईल. 

सर्व कारखाने व आस्थापनांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचा-यांची आरटीपीसीआर (RTPCR) तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. Baramati Market will be open from Nine am to Six PM pm 

दहावी बारावीच्या नियोजित परिक्षा (Exams) वगळता सर्व शाळा व महाविद्यालयांचे कामकाज येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद असेल. शासकीय नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई पोलिस (Police) करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

जिल्हाधिका-यांनी पुणे (Pune) जिल्ह्यात जरी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंतचा आदेश काढलेला असला तरी बारामतीतील कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या विचारात घेता बारामतीत मात्र सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी करण्यात आलेली आहे. बारामतीत आता संध्याकाळी सात ऐवजी सहा वाजताच दुकाने बंद करावी लागणार आहेत. All 

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live