बारामतीकर व्यापा-यांनी पुकारला सोमवारपासून एल्गार.....

मंगेश कचरे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

एकीकडे शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला सहकार्य करण्याची भूमिका घेताना दुसरीकडे सोमवारपासून नियमितपणे दुकाने उघडण्याचा निर्णय आज बारामतीतील व्यापा-यांनी घेतला आहे

बारामती : लॉक़डाउनला Lockdown कंटाळलेल्या बारामतीच्या व्यापा-यांनी आता एल्गार पुकारला आहे. एकीकडे शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला सहकार्य करण्याची भूमिका घेताना दुसरीकडे सोमवारपासून नियमितपणे दुकाने Shops उघडण्याचा निर्णय आज बारामतीतील Baramati व्यापा-यांनी घेतला आहे.  Baramati Traders decided to open Shops on Monday

व्यापा-यांनी आता काहीही झाले तरी सोमवारी Monday सकाळी नऊ वाजता दुकाने उघडायचीच, असे ठरवले आहे. आज बारामती Baramati व्यापारी महासंघाचा हा निर्णय अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी शहरातील सर्व व्यापा-यांपर्यंत पोहोचविला आहे. लॉकडाऊन Lock Down सुरु झाल्यापासूनच व्यापा-यांमध्ये अस्वस्थता होती, दुकाने बंद ठेवण्याची कोणाचीच आता तयारी नसल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले. 

आज बारामतीत व्यापा-यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीस अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सचिन सातव, सुशील सोमाणी,  स्वप्निल मुथा,  प्रवीण गांधी,  चेतन व्होरा,  अभय गादीया,  संजय सोमाणी,  बाळू चांदगुडे,  सुधीर वाडेकर, परेश वीरकर,  नरेंद्र मोता,  शैलेश साळुंखे,  सुरेंद्र मुथा, फखरु भोरी,  जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा,  प्रमोद खटावकर,  किरण गांधी यांच्याह अनेक व्यापारी उपस्थित होते. Baramatikar trader Elgar from Monday 

महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, Maharashtra Chamber of Commerce फॅम यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला. तथापि सोमवार पासून सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत उघडावीत असेही यात एकमताने निश्चित झाले. सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 Covid 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे.  तसेच आपल्या कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन नरेंद्र गुजराथी यांनी केले. 

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live