पुण्यात बैलांची पूजा सोडून बारबालांचा डान्स

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पिरंगुट : काही लाेकं कुठल्याही सणाला काय करतील याचा नेम नाही. याचाच प्रत्यय शनिवारी पुण्यातील सुस येथे आला. काल बैलपाेळ्याचा सण हाेता. यानिमित्त परंपरेनुसार बैलांची पुजा करून त्यांना आराम दिला जाताे. त्यांची मिरवणूक काढली जाते. काल शनिवारी सुस येथे मात्र वेगळेच चित्र दिसले. बैलपाेळ्याच्या मिरवणूकीत बारबालांना नाचविण्यात आले.     

सुस (ता. मुळशी) येथे बैलपोळा सणाला आता हिडीस व विकृत स्वरूप आलेले आहे. यावर्षी हा सण साजरा करताना बैलांच्या मिरवणूकीसमोर बारबालांचा डान्स सुरु हाेता. त्यामुळे हा नवा मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही उत्साही मंडळींनी व ग्रुपनी बैलांपुढे चक्क बारबाला नाचवल्या आहेत. मात्र हा नवा पायंडा सर्वांच्या टीकेचा विषय झाला आहे. यावर साेशल मिडियात जाेरदार चर्चा रंगली आहे. जुन्या जाणत्या नागरिकांनी मात्र या बाबीवर जाेरदार टीका केली आहे.

Web Title: barbala dance in bailpola festival at Sus Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live