कोरोनाबाधित रुग्णाची कोविड सेंटरमध्येच आत्महत्या; बार्शीमध्ये घडली घटना

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालय कोविड सेंटरमध्ये एका 37 वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे.

बार्शी : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 37 वर्षीय इसमाने कोविड सेंटरमध्येच आत्महत्या केली आहे. त्यामुळे बार्शीमध्ये खळबळ उडाली आहे. उमेश कोंढरे असे या इसमाचे नाव असून ते बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावचे रहिवासी होते. कोंढरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी आणि दोन्ही मुले कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे कोंढरे यांच्यावर बार्शीतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत होते. Corona  patient commits suicide by hanging at covid Center

- औरंगाबाद प्रशासनाचा अजब कारभार; निर्बंध कडक केलेत की टार्गेट दिलंय?

दरम्यान, मंगळवारी (ता.6) पहाटे 5 वाजता कोंढरे यांनी कोविड सेंटरमधील स्वच्छता गृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंढरे यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पुढील तपास बार्शी पोलिस (Barshi Police) करत आहेत.

(Edited By - Digambar Jadhav)


संबंधित बातम्या

Saam TV Live