विनोद कांबळेंच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालचित्रपटाचा मान...

विश्वभूषण लिमये
सोमवार, 29 मार्च 2021

संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून सोलापूर जिल्ह्याला पारितोषिक मिळाले आहे. सोलापुरातील बार्शी मधील विनोद कांबळे दिग्दर्शित 'कस्तुरी' या हिंदी भाषेतील चित्रपटाला 'सुवर्ण कमळ' मिळालं आहे.

सोलापूर: 76 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली, या पुरस्कारांसाठी देशातील विविध ठिकाणाहून नामांकने आली होती. या नामांकनामधून संपूर्ण देशभरातून सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून सोलापूर जिल्ह्याला पारितोषिक मिळाले आहे. सोलापुरातील बार्शी मधील विनोद कांबळे दिग्दर्शित 'कस्तुरी' या हिंदी भाषेतील चित्रपटाला 'सुवर्ण कमळ' मिळालं आहे. Barshi Film Directors Kasturi won Best National Childrens Film Award

अमर देवकर यांच्या 'म्होरक्या' चित्रपटानंतर बार्शीला हा दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'कस्तुरी' (Kasturi) या चित्रपटाचे (Movie) संपूर्ण चित्रीकरण बार्शीतच (Barshi) झालेले असून, चित्रपटाची टेक्निकल टिम वगळता सर्व कलाकार हे बार्शीतील रहिवासी आहेत. चित्रपटाची कथा एक सफाई कामगाराच्या मुलाची व्यथा यावर आधारित आहे. "कस्तुरी" असे या चित्रपटाचे नाव आहे. समाजातले कनिष्ठ दर्जाचे मानले जाणारे सफाई करण्याचे काम करत असलेल्या  मुलाची ही कथा चित्रपटातून मांडली गेली आहे. Kasturi won Best National Childrens Film Award

कस्तुरीचे दिग्दर्शक असणारे विनोद कांबळे यांनी यापूर्वी अनेक लघुपट बनवले आहेत.  मात्र मोठा चित्रपट बनवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. आणि पहिल्याच प्रयत्नात  त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने 'कस्तुरी' चित्रपटाच्या टीमने आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाची त्यांना पोचपावती हि मिळाली आहे.त्यामुळं 'बार्शी तिथं सरशी' हे ब्रीद पुन्हा एकदा 'कस्तुरी' चित्रपटाच्या टीमने खरं करून दाखवलं आहे.

Edited By - Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live