'जनगणना होणार डिजिटल

'जनगणना होणार डिजिटल

मार्च, २०२१पासून देशभरात सुरू होणारी जनगणना मोबाइल अॅपच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आणि त्याच्या साह्याने भविष्यातील योजनांची रूपरेषा आखण्याचे उद्दिष्ट शहा यांनी ठेवले आहे.देशातील आठव्या जनगणनेच्या माध्यमातून डिजिटल क्रांती घडवून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे सर्व दस्तावेज एकीकृत करून त्यांचे एकच कार्ड बनवण्याची संकल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मांडली.

डिजिटल जनगणनेला काही सॉफ्टवेअरची जोड दिल्यास आधार कार्ड, बँक कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना यांना एकत्र आणून सर्व माहिती एकाच कार्डात ठेवणे शक्य होऊ शकते. त्यामुळे जनगणनेची ही प्रक्रिया डिजिटल क्रांतीसारखी ठरणार आहे', असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.'जनगणनेचे डिजिटायझेशन करण्याचे अनेक फायदे आहेत. जन्म आणि मृत्यूचे रजिस्टर मतदारयाद्यांना जोडल्यास मतदारयाद्या आपोआप अद्ययावत होऊ शकतील.

'जनगणनेत मोबाइल अॅपचा प्रयोग करण्यात येईल. जनगणनेची आवश्यक दस्तावेज कागदोपत्री उपलब्ध असेलच. पण डिजिटल डेटा उपलब्ध झाल्याने सॉफ्टवेअरच्या साह्याने अनेक प्रकारच्या विश्लेषणांसाठी त्याचा बहुआयामी वापर करता येणार आहे. देशाच्या विकासाची रूपरेषा आखण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. याच जनगणनेच्या आधारावर वॉर्ड, विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या स्वरूपासह एकूणच लोकप्रतिनिधित्वाचा आधारही निश्चित होणार आहे', याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले.

रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या प्रस्तावित सात मजली मजली इमारतीचा शिलान्यास करताना अमित शहा यांनी आगामी जनगणनेविषयी माहिती दिली. 'जनगणनेचा हा कार्यक्रम देशाचा सामाजिक प्रवाह, अंतिम व्यक्तीचा विकास आणि भविष्यातील कामांच्या नियोजनासाठी तसेच मनुष्यबळ, लोकांचे अध्ययन, संस्कृती, आर्थिक व विकासाच्या दिशा निश्चित करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जनगणना आमच्या भविष्याच्या विकासासाठी आधारशीला ठेवण्यासाठी कशी उपयुक्त ठरते, हेही देशावासीयांपुढे येणे आवश्यक आहे', असे ते म्हणाले. 'ही जनगणना जेवढी सुक्ष्मपणाने, गंभीरपणे, लोकसहभागासह होईल, तेवढी अधिक परिणामकारक ठरून त्यामुळे देशाची लोकशाही आणि अर्थतंत्र मजबूत होईल. जनगणनेचा शास्त्रीय पद्धतीने वापर दारिद्र्य निर्मूलनासह देशाला समृद्ध, शिक्षित आणि विकसित करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दोन वर्षांचे हे पुढच्या २५ वर्षांसाठी देशाचे भवितव्य निश्चित करते. त्यामुळे हे काम लोकसहभागाने अचूकपणे आणि मनःपूर्वक व्हायला हवे', असे आवाहन शहा यांनी केले.

Web Title 'Census will be digital


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com