मोबाईल रिचार्ज आणखी महागण्याची शक्यता 

मोबाईल रिचार्ज आणखी महागण्याची शक्यता 

 मुंबई : आता मोबाईल रिचार्ज महागण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय..  टेलिकॉम कंपन्यांनी  40 टक्के टॅरिफ दरवाढ केल्यामुळे युजर्सच्या खिशाला कात्री लागणार आहे. येत्या काळात अजून दरवाढ होऊ शकते. 

सीओएआयने यूजरला गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे यासाठी फ्लोअर प्राईस निश्चित करण्याची मागणी 'ट्राय'कडे केली आहे. फ्लोअर प्राईस निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होईल अशी शक्यता नर्तवली जात आहे. सध्या  भारतात जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत एअरटेल सर्वाधिक चांगली 4 जी सेवा देत आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणे आवश्यक आहे. असं मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक जनरल राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले आहे. यासोबत प्रतिग्राहक सरासरी महसूल 200 रुपये इतका वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

'ट्राय' सध्या याप्रकरणी समभाग धारकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे त्यानंतरच दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही आठवडय़ांमध्ये ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

WebTittle ::  Mobile recharge may be more expensive

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com