सांगलीत क्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांना झाला दंड
sangli poilce karvai

सांगलीत क्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांना झाला दंड

सांगली :  कोरोना Corona संसर्गाचा वाढत असणारा विळखा अद्यापही नागरिकांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. सांगलीत Sangli लॉकडाऊन Lockdown सुरु असताना देखील लॉकडाऊनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या दहा तरुणांवर सांगली पोलिसानी Police दंडात्मक कारवाई केली आहे. सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम  येथे १४ तरुण क्रिकेट Cricket खेळत होते. पोलिस आल्याचे पाहताच यातील ४ जण पोलिसांना पाहून पळून गेले. Punitive action against Ten youths playing cricket in Sangli

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.  पण नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पहावयास मिळत आहे.

हे देखील पहा-

आज सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम वर तरुण क्रिकेट आणि काही जण व्यायाम करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन तरुणांना ताब्यात घेतले. यातील 4 जण पळून गेले आहेत तर १० जणांच्या वर दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे. Punitive action against Ten youths playing cricket in Sangli

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com