लष्करे तय्यबाच्या हिटलिस्टवर टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू 

लष्करे तय्यबाच्या हिटलिस्टवर टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू 

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच तणावाचे वातावरण राहिले आहे. मग ते दोन्ही देशांच्या जवानांमध्ये असो किंवा क्रिकेटच्या मैदानावर. असाच भयानक प्रसंग आता घडला आहे.  लष्करे तय्यबाच्या हिटलिस्टवर टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनी दिली आहे. 
दहशतवादांच्या रडावर क्रिकेटपटू असण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली  लष्करे तय्यबाच्या रडारवर आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या यादीमध्ये विराटच्या नावाचा समावेश आहे. 
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच तणावपूर्ण वातावरण राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2008 मध्ये झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर एकही द्विपक्षीय मालिका खेळविण्यात आलेली नाही. भारत-पाक फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. भारत-पाक यांच्यात 13-19 फेब्रुवारी या कालावधी पाकिस्तानात मालिका होणार होती मात्र, भारताने ती रद्द केली होती. त्यानतंर भारत-पाक यांच्यात एकही सामना झालेला नाही. 
त्यानंतर अतर सगळ्या संघांनीही पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला त्यामुळे पाकिस्तानात तब्बल 10 वर्षे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळविला गेला नाही. यावर्षी गेल्याच महिन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला. 
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेकडून 12 जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाचाही समावेश आहे.  

WebTittle:: Team India's premier player on military hit list


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com