१२४ वर्षांच्या आजीनं घेतली कोरोनाची लस

१२४ वर्षांच्या आजीनं घेतली कोरोनाची लस
rehete begam

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोट्यवधी लोकांचे नुकसान झाले. परंतु, अजूनही देशात असे लाखो लोक आहेत ज्यांना कोरोना लस नका घेऊ यासारखे विचित्र युक्तिवाद करण्यास किंवा सबब सांगण्यात आनंद वाटतो. परंतु, असे काही लोक आहेत ज्यांनी सर्व शंका आणि भीती दूर करून कोरोनाची लस घेतली आणि ते हिरो बनले. याचेच एक उदाहरण म्हणजे रेहेते बेगम यांनी १२४ वर्षांच्या असतानाही लस घेतली आहे.(A 124-year-old grandmother was vaccinated against corona)

रेहते बेगम या बारामुल्लाच्या वागुरा ब्लॉकमधील शर्कवारा गावच्या रहिवासी आहेत. काश्मीरमध्ये डोर-टू-डोर लसीकरण मोहिमेदरम्यान त्यांना लस देण्यात आली. जम्मू-काश्मीर जनसंपर्क आणि माहिती विभाग ही मोहीम राबवित आहे. रेहेते यांनी लसी घेण्यास अजिबात संकोच दाखविला नाही आणि आरामात लस टोचून घेतली. इतर लोकांना लस घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, देशात १६ जानेवारीपासून लसीकारण सुरु झाले. देशाने ठरवलेल्या धोरणानुसार तीन टप्यात लसीकरण सुरु आहे. सुरुवातीच्या काळात लसी संदर्भात अनेकांच्या मनात भीती होती. परंतु, अनेक राजकीय नेते, समाज माध्यमाने लसीकरणाबाबत जनजागृती सुरु केली आणि लोक हळूहळू लस घेण्याकडे लोकंचा कल वाढला. देशात सध्या कोविशील्ड, कोवॅक्सिन या दोन प्रमुख लसी आहेत. केंद्र सरकार हळू हळू विदेशी लसींना परवानगी देत आहे.

देश सध्या दुसऱ्या लाटेशी लढत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, अनेक राज्यांनी तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली आहे. लवकरच देशात २ ते १८ वर्ष वयोगातील मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार आहेत. 

Edited By : Pravin Dhamale 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com