अमेरिकेहून Amphotericin B चे 2 लाख डोस भारतात आले

अमेरिकेहून Amphotericin B चे  2 लाख डोस भारतात आले
AmBisome

कोरोना विषाणूने Corona Virus  देशात थैमान घातल्यानंतर देशात  India म्युकरमायकोसिस Mucurumcosis म्हणजेच काळ्या बुरशीच्या Black Fungus आजाराने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अशातच काळ्या बुरशीला रोखण्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक असणारे औषध अ‍ॅमफोटेरिसिन बी'च्या  Amphotericin B injection दोन लाख  डोस भारतात आले आहेत. काळ्या बुरशीच्या उपचारात अ‍ॅमफोटेरिसिन  बी'चा उपयोग केला जातो.  (2 lakh doses of Amphotericin B came to India from USA) 

आज सकाळी (२९ मे ) काळ्या बुरशीच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या अ‍ॅम्बिझोम (अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन) ची पहिली खेप भारतात पोहोचली. अमेरिकेतीळ भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी याबाबत ट्विट केले आहे. " अमेरिकेतील गिलियड साँसेसमधून @GileadSciences मधून  ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी  अ‍ॅम्बिझोमची एक खेप भारतात आली आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख डोस पोचले आहेत. लवकरच अजून लसीचा साठा भारतात येईल.'' असे तरनजितसिंग यांनी आपल्या ट्वीट म्हटले आहे.  कोविड -19 च्या रूग्णांमध्ये ज्यांना संसर्गाच्या उपचारांसाठी स्टिरॉइड्सची भारी मात्रा दिली गेली होती, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. 

दरम्यान, साथरोग कायद्याअंतर्गत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, तामिळनाडू आणि बिहारसह अनेक राज्यांनी काळ्या बुरशीला साथीचा रोग असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्व संबंधित  अधिकाऱ्अयांना जगातील कोठूनही युध्दपातळीवर औषधाची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com