जुन्नरमध्ये घरासमोर लग्न पडले महागात, नवरदेवासह २३ जणांना कोरोनाची लागण

जुन्नरमध्ये घरासमोर लग्न पडले महागात, नवरदेवासह २३ जणांना कोरोनाची लागण
marriage

जुन्नर - तालुक्यातील निमदरी धोंडकर वाडीतल्या एका घरगुती लग्नसोहळ्याला Marriage उपस्थित राहिलेल्यात नवरदेवासह bridegroom घरातील व नातेवाईक Relatives असे एकूण 23 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींचे कोरोना Corona अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोंडकर वाडीत खळबळ उडाली आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट Report पॉझिटिव्ह आले असून याच कुटुंबातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 23 people including bridegroom is corona positive

लॉकडाऊनमध्ये Lockdown लग्न सोहळ्याला फक्त पंचवीस वऱ्हाडी मंडळींना परवानगी असताना धोंडकर वाडीच्या ऋषिकेश धोंडकर व आरती फोडसे यांचा 4 मे ला घरी लग्न सोहळा आयोजित केला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 5 मे ला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.

हे देखील पहा -

यानिमित्ताने नातेवाईक व  पाहुणे यांची गर्दी झाली होती. लग्नानंतर दोन दिवसाने नवरदेव मुंबईला जाऊन आला होता. त्यानंतर नवरदेवाची  टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या नातेवाईकांची टेस्ट करण्यात आली. 23 people including bridegroom is corona positive

लेण्याद्री येथील कोविड सेंटरला टेस्ट करण्यात आलेल्या चाळीस जणांपैकी बारा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून खाजगी ठिकाणीसुद्धा दहापेक्षा जास्त जण पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या 23 पेक्षा जास्त वाढली आहे.घरगुती पध्दतीने हा लग्न सोहळा झाला होता. मात्र काळजी न घेतल्याने एवढी मोठी रुग्ण संख्या वाढल्याच ग्रामस्थ बोलत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com