नागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर

नागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर
Saam Banner Template

नागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर रहिवाशी आहेत. त्यामुळं दुर्देवानं एखादी घटना घडल्यास जिवीतहानी होऊ शकते. प्रशासनानं मात्र या इमारतींना नोटीस देऊन औपचारिकता पूर्ण केली आहे. (245 buildings dangerous in Nagpur; Citizens roam in 139 buildings)

गेल्या आठवड्यात मुंबईत इमारत पडून 11 लोकांचा मृत्यू झाला. अशा घटनांमध्ये महापालिका जबाबदार असेल असं मुंबई उच्च न्यायालयानं ठणकावून सांगितलं. नागपुरातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नागपूरात 245 धोकादायक इमारती आहेत. यातील 239 इमारतींमध्ये तर लोकांचं वास्तव्य आहेत. त्यामुळं मुसळधार पावसामुळं किंवा वादळ वाऱ्यामुळं या इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने या इमारतींना नोटीस दिल्या आहेत. मात्र, कायदेशीर बाबींमुळं या इमारती रिकाम्या करता येत नसल्याचे अधिकारी सांगतात. 

हे देखील पाहा

शहराच्या जवळपास सर्वच भागात अशा धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे या इमारती गजबजलेल्या भागात आहेत. त्यामुळं एखादी घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुरात 245 इमारती धोकादायक असल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये इमारती कोसळण्याच्या घटना कायम घडत आहेत. त्याच पार्शवभूमीवर आता सर्वच महानगरपालिकांनी इमारतींचं ऑडिट करणं गरजेचं आहे.

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com